मित्र-मैत्रिणींनो, योगाचा इतिहास काय असावा? असा प्रश्न विचारला जातो. बघूया का आपण?
योगाचे मूळ अंदाजे ५००० वर्षापूर्वीचे असावे असा अंदाज वर्तविला जातो. योग विद्येचा इतिहास बघता भगवान शिव हे प्रथम योगी/ आदि योगी अथवा प्रथम गुरु मानले जातात.
योगशास्त्राचे प्राथमिक सिद्धांत भारतीय उपखंडात वेदांमध्ये आणि उपनिषदांमध्ये आढळतात. ऋग्वेद, अथर्ववेद, उपनिषद आणि महाभारत या प्राचीन ग्रंथांमध्ये योगाचे उल्लेख आहेत. योगाचे प्रारंभिक तत्त्वज्ञान पतंजलि मुनींनी ” पतंजली योगसूत्र” या ग्रंथात सुमारे २०० ई.स. पूर्व संकलित केले आहे.
योगशास्त्राचा इतिहास साधारणपणे सहा भागांमध्ये विभागूया. त्यामुळे इतिहास समजणे अतिशय सोपे जाईल.
१) महाभारत आणि रामायण काल – प्राचीन काल (सुमारे ५००-२०० ई.पू.):
महाभारत आणि रामायण या दोन महाकाव्यांचा योगशास्त्राशी संबंध आहे. या ग्रंथांमध्ये योगाचे तत्त्वज्ञान, तत्त्वे, आणि साधनेचे उल्लेख आढळतात. हे महाकाव्य केवळ ऐतिहासिक आणि धार्मिकच नाहीत, तर आत्मसाक्षात्कार आणि आध्यात्मिक मार्गदर्शनाचे स्त्रोत देखील आहेत. भगवद गीतेत महाभारताच्या तत्त्वज्ञानाचे सार असून, यात कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग व ध्यान योग असे योगाचे विविध प्रकार सांगितले आहेत. रामायणातील श्रीराम, सीता, हनुमान, रावण यांच्या जीवनात योगाचे तत्त्वज्ञान आणि साधना स्पष्टपणे दिसून येतात.
२) वैदिक काल (सुमारे ३०००-१५०० ई.पू.):
योगाचा प्रथम उल्लेख वैदिक संहितांमध्ये आला आहे. चार वेदांमध्ये – ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, आणि अथर्ववेद यामध्ये योगाशी संबंधित तत्त्वांचे आणि प्रथांचे वर्णन आढळते. वेदांच्या मंत्रांमध्ये ध्यान, प्राणायाम, आसन, मंत्र , भक्ति, रितीभाती जगण्याचे नियम, आत्मसाक्षात्काराच्या तत्त्वांचे विविध संदर्भ आहेत.
३) उपनिषद काळ (सुमारे १०००-५०० ई.पू.):
हा काळ असा होता ज्यामध्ये ऋषि-मुनींनी वेदांचे शिक्षण गुरुकुलांमध्ये आपल्या शिष्यांना द्यायचे. या काळात ध्यान, तपस्या, ज्ञान आणि आत्मभान प्रक्रियेचे अधिक स्पष्ट वर्णन आढळते. योगाचे शास्त्रशुद्ध शिक्षण गुरुंकडून शिष्यांना मिळाले होते.
४) पतंजलि योगसूत्र (सुमारे २०० ई.पू.):
हा अत्यंत गहन व महत्त्वपूर्ण ग्रंथ. पतंजलि मुनींनी योगाचे सूत्र रूपात संकलन केले. हे सूत्रे आठ अंगांवर आधारित आहेत: यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. यातील अष्टांग योगाचे तत्त्वज्ञान, साधना, सजगता,आत्मसाक्षात्काराच्या मार्गदर्शनामुळे योग साधकांना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक प्रगती साधता येते. योगसूत्रांचे अभ्यास आणि पालन केल्याने जीवनात संतुलन, शांती, आणि आनंद प्राप्त करता येतो.
५) मध्ययुगीन काळ (५००-१५०० ई.):
तंत्र योग व हठयोग हे दोन्ही महत्त्वपूर्ण प्रकार या कालावधीतले. तंत्र योग व्यापक दृष्टिकोनातून ध्यान, मंत्र, यंत्र, पूजा व आध्यात्मिक प्रगती साधतो तर हठ योग शरीर व मनाच्या संतुलना बरोबर कुंडलिनी शक्ती जागृत करून अध्यात्मिक प्रगती साधतो. हा हठयोगाचा विकासनशील काळ आहे. योगी गोरक्षनाथ, मत्स्येंद्रनाथ यांनी हठयोगाचा प्रचार केला. हठयोग प्रदीपिका – स्वामी स्वात्माराम सुरी, घेरंड संहिता – योगी घेरंडमुनी, हठ रत्नावली – श्रीनिवास भट्ट योगी, शिव संहिता इत्यादी ग्रंथ या काळात रचले गेले.
६) आधुनिक काळ
मोहेंजो-दडो आणि सिंधू संस्कृती (२६०० इ.स. ते १९०० इ.स.)
मोहेंजोदडो व सिंधू संस्कृतीच्या उत्खननात सापडलेल्या सील व आकृत्यांमधून असे कळते की त्या काळातही ध्यान, धारणा, योगिक तत्व व प्रथांचे अस्तित्व असावे.
(८ ते १४वे शतक):
आदी शंकराचार्य – ८ वे शतक, अद्वैत वेदांताचा प्रचार, वेदांत सिद्धांतांची स्पष्टीकरणे व केंद्रीकरण.
रामानुजाचार्य – ११ वे शतक – वेदांत, ज्ञानेश्वरी साहित्याचं संरक्षण, विशिष्टद्वैत व भक्तीयोग प्रचार.
माधवाचार्य – १४ वे शतक – वेदांत, ज्ञानेश्वरी साहित्याचं संरक्षण, विशिष्टद्वैत व भक्तीयोग प्रचार.
(१५ ते १८वे शतक)
संत सूरदास, संत तुलसीदास, संत पुरंदर दास, संत मीराबाई, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत सोयराबाई, संत बहिणाबाई यांनी भक्ती, हठ योग, तंत्र योगामार्गे समाज प्रबोधन केले.
नाथसंप्रदाय हा भारतातील एक महत्त्वपूर्ण आध्यात्मिक आणि योग संप्रदाय आहे, ज्याची स्थापना मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांनी केली. १५ ते १८ व्या शतकाच्या दरम्यान, नाथ संप्रदाय महाराष्ट्रात आणि इतर भागांमध्ये प्रचलित झाला. नाथ संप्रदायाचे प्रमुख योगी आणि संतांनी योग, तंत्र, आणि आध्यात्मिक साधनांच्या विविध तंत्रांचा प्रचार केला. त्यांनी समाजातील विविध स्तरांमध्ये आध्यात्मिक जागरूकता निर्माण केली आणि योगाच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार केला.
समाजात संतुलन, शांती, आणि आनंद प्राप्त करण्याचा मार्ग सुकर झाला.
(१८ ते २० वे शतक)
श्री अरबिंदो – तत्त्वज्ञ, कवी व योगी. “इंटिग्रल योग” – पूर्ण योग या योग तंत्राचा वापर करून शारीरिक मानसिक व आध्यात्मिक विकास ध्यान आणि साधनेतून केला.
स्वामी विवेकानंद – तत्त्वज्ञ, मॉर्डन योगी. ‘राज योग’ या ग्रंथातून योग, तंत्र, मन व आत्मा यांच्या नियंत्रणासाठी ध्यान प्राणायामाचा उपयोग.स्वामी विवेकानंद यांनी १८९३ साली शिकागो येथे पार्लमेंट ऑफ रिलीजन्स मध्ये राजयोग, कर्मयोग, भक्तियोग व ज्ञानयोग याबद्दल विचार मांडले.
रामकृष्ण परमहंस – ज्ञान भक्ती, ध्यान मार्फत योग प्रचार केला.
स्वामी दयानंद सरस्वती – आर्य समाजाचे संस्थापक. सत्यार्थ प्रकाश ग्रंथातून योग व तंत्राचा प्रचार केला.
आधुनिक योगाचार्य –
टी कृष्णमाचार्य
श्री. के. पटाभी जोईस
स्वामी शिवानंद
बी. के. एस. अय्यंगार
कुवलायानंदजी
श्री योगेंद्र जी
स्वामी सत्यानंद
श्री श्री रवी शंकर
सद्गुरु जग्गी वासुदेव जी
डॉ. नागेंद्रजी
स्वामी रामदेव
या प्रकारे योगशास्त्राचा इतिहास विस्तृत आणि समृद्ध आहे. योगाची परंपरा आणि त्याचा प्रभाव आजही जगभर अनुभवला जात आहे.
डॉ. श्वेता वर्पे
योगा – योग
9773495678
@Copyright reserved